राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुंबईत मंत्रालयात फडणवीस यांच्या कार्यालयात एका महिलेने तोडफोड केली. तसेच पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनांवरून निशाणा साधात सुप्रिया सुळे यांनी हे महायुती सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.