सुप्रिया सुळे यांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज न्यायालयात शरद पवार यांना पक्ष चिन्ह द्यायच नाही, असा युक्तीवाद अजित पवार यांच्या वकिलाने केला. यावर वकील 10-15 मिनिटं वाद घालत होते. त्यावर न्यायालयाने सागितले, असं होऊ शकत नाही. शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, चुकीच हट्ट धरू नये असे न्यायालयाने म्हटले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार जेव्हा म्हणतात शरद पवार साहेब यांची निवड चुकीची आहे. पण न्यायालयात दोघांच्याही निवड चुकीची आहे, असं म्हणत आहे. शरद पवार साहेब यांना काहीच द्यायच नाही, असं कसं म्हणू शकता, असंही न्यायालयाने म्हटलं. तसेच आता जे अजित पवार यांना पक्ष चिन्ह दिलंय, ते फायनल ऑर्डर नाही. असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली, यासाठी मी न्यायालयाचे आभार मानते. आमच्या पक्षाला नवीन चिन्ह दिलं पाहिजे. अजित पवार यांचे वकील दडपशाही करत आहेत, असं वाटतं. शरद पवार साहेब यांना पक्ष चिन्ह द्यायच नाही, असं अजित पवार यांचे वकील म्हणत होते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा रडीचा डाव आहे. ज्या माणसाचा पक्ष आहे, त्या माणसाला काहीच द्यायच नाही. आम्हीही दुसरं काही करायचच नाही, आयुष्यत आम्ही काय करायचं? भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे. महाराष्ट्राची तुलना शेजारच्या देशाशी होते, हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. वैचारिक लढाई लढायची आहे.असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दरम्यान, न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीत पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव कायम राहणार, न्यायालयाने म्हटलं आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरतं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा, अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायलयाने हा निर्णय दिला आहे.असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे बोलताना सांगितले आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये शेजारच्या देशात काय चालंलय हे पाहा. आपल्या देशात होता कामा नये असं कोर्ट म्हणाले. आपल्या राज्याची तुलना पाकिस्तानशी होतेय हे दुर्देव आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे. महाराष्ट्रची तुलना शेजारच्या देशाशी होते. हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. आम्हाला वैचारिक लढाई लढायची आहे. यशवंतराव चव्हाणांना काय वाटत असेल. आमच्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता भोगणं नाही. एक वैचारिक चौकट आहे. आमची वैचारिक लढाई आहे. वैयक्तिक नाही. आमची काय चूक आहे. आम्ही हाय परफॉर्मिंग आमदार आणि खासदार आहोत ही आमची चूक आहे का? आम्ही काम करतो ही आमची चूक आहे. ज्यांच्यावर आरोप झाले. त्यांना तुम्ही घेता असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं हे दुर्देवी आहे. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचा तो अध्यक्ष होता. तुमचे मतभेद असेल तर तुम्ही वेगळी चूल मांडू शकता. तुम्हाला तो अधिकार आहे. असं असतानाही त्यांनी शरद पवार साहेब यांच्यासह सहा दशके राज्य आणि देश राहिला आहे. त्यांनी देशाने पद्मविभूषण या योगदानाबद्दल दिलं आहे. पण त्यांचाच पक्ष काढून घेतला हे दुर्देवी आहे. त्यांना चिन्ह, पक्ष द्यायचा नाही हा रडीचा डाव नाही तर काय आहे. देशात पहिल्यांदाच संस्थापकाला पक्ष नाकारला जात आहे, हे दुर्दैव आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मतभेद असतील तर तुम्हाला वेगळी चूल करायची होती. पक्ष चिन्ह काढून काम करायला हवं होतं. हा रडीचा डाव आहे, ज्या माणसाचा पक्ष आहे, त्या माणसाला काहीच द्यायचं नाही, आम्ही दुसरं काही करायचंच नाही. आयुष्यात आम्ही काय करायचं? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. ‘अदृश्य शक्तीकडून आम्ही आता फक्त न्याय मागतोय. जे काही व्हावं ते मेरिटवर झालं पाहिजे, जर शरद पवार यांच्या निवडीला चॅलेंज तर अजित पवार यांच्याही निवडीला चॅलेंज झालं पाहिजे. शरद पवार साहेब स्वतःच्या हिमतीवर आहेत. तर दुसऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्ती किती दबाव टाकते याचा विचार करावा. रामाने वडिलांसाठी १४ वर्षे वनवास केला. लक्ष्मण सोबत होता. भाजपच्या आदर्श नेत्या सुषमा स्वराज होत्या असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.