शिक्षण तिसरीपर्यंत… पण आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना देतोय कसरतीचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

25 वर्षांपूर्वी तो मुंबईत आला… शिक्षण तर अवघे तिसरीपर्यंतच. तरिही जिद्दीने मिळेल ती छोटी मोठी नोकरी करत गेला. व्यायामाची, फिटनेसची मात्र त्याला आवड. त्या आवडीच्या -जोरावरच तो गेल्या सात वर्षांपासून आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना कसरतीचे धडे देत आहे. ही गोष्ट आहे सूरज चौहान याची.

वरळीतील झोपडपट्टीत चार मुलं व पत्नीसह राहणारा सुरज गेल्या सात वर्षांपासून आयएसएस- आयपीएस अधिकाऱ्यांना व्यायामाचे धडे देत आहे. त्याने तब्बल 121 मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला असून, त्यातील काही स्पर्धामध्ये त्याने पदकही मिळवली आहेत.

सुरजने त्याच्या छोट्य छोट्या नोकऱ्यांच्या जोरावर चारही मुलांना शिकवले आहे. मोठ्या मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे, तर मुलगा कॉम्प्युटर इंजिनियरींग करत आहे. अन्य दोन्ही मुलांचे शालेय शिक्षण सुरू आहे.