आशा भोसले यांच्या नावाने संगीत जीवन गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह असे राहणार आहे.