विश्वचषकाच्या संघात Mumbai Indiansचे वर्चस्व, मुंबईच्या सहा खेळाडूंचा संघात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आता आयपीएल बरोबरच T20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघनिवडमध्येही आपली छाप पाडली आहे. आगामी T20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने बुधवारी संघाची घोषणा केली. जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यांच्या संघांमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सहा खेळाडूंचा समावेश आहे.

पुढील महिन्यात 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत यूएई T20 विश्वचषकाच्या आयोजन करण्यात आले आहे. विश्वचषकाचे बिगुल वाजले असून बहुतांश देशांनी विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने देखील बुधवारी संघ घोषणा केली. या संघामध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळणाऱ्या रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव, राहुल चहर, ईशान किशन, हार्दिक पांड्या या सहा खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान विश्वचषकपूर्वी UAE मध्येच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

19 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सपाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सचा रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल या तीन खेळाडूंना टी-20 विश्वचषकात संधी देण्यात आली आहे. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघातील के.एल.राहुल आणि मोहम्मद शमी या दोघांना संधी देण्यात आली आहे. तर आरसीबी, चेन्नई सुपर किंग, कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघातील प्रत्येकी एका खेळाडूला T20 विश्वचषकाच्या संघामध्ये संधी देण्यात आली आहे