
छोटय़ा मुलांच्या प्रचंड आवडीच्या कॉटन कँडीवर तामीळनाडू सरकारने शनिवारी बंदी घातली आहे. कॉटन कँडीमध्ये केमिकलचा वापर होत असून यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत सरकारने यावर बंदी घातली आहे. तामीळनाडूमधील आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी खाद्य सुरक्षा अधिकाऱयांना आवश्यक उपाय आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
























































