कांदा आणखी रडवणार, 200 रुपये किलो होणार दर

666

कांद्याच्या प्रचंड वाढलेल्या दरांमुळे गृहिणींना अक्षरश: नाकीनाऊ आले आहेत. कांद्याशिवाय जेवण बनवायचे तरी कसे असा प्रश्न पडलेला असतानाच कांद्याचे भाव आणखीनच वाढणार असल्याची शक्यता आहे. हे दर तब्बल 200 रुपये प्रती किलोपर्यंत देखील जाऊ शकतात अशी शक्य़ता वर्तवली जात आहे.

सध्या तामिळनाडूतील मदुराई येथे कांदे 200 रुपये किलोने विकले जात आहेत. कांद्याच्या वाढत्या भावाचा फटका गृहिणींसोबत विक्रेत्यांना देखील बसला आहे. ग्राहक सध्या पाव किलो किंवा अर्धा किलोच कांदे खरेदी करत असल्यामुळे एवढा महाग घेतलेला माल पडून राहत आहे अशी खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या