निवेदक तपस्वी राणे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाहिरी लोककला मंचचे निवेदक, चित्रकार, कलावंत तपस्वी राणे यांचे परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अर्धांग वायूच्या आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय अवघे 50 वर्षे होते.

बालरंगभूमीवरून आपल्या कलेच्या कारकीर्दीला आरंभ करणाऱ्या तपस्वी राणे यांनी निवेदनात सखोल अभ्यास आणि पुशल वाक्चातुर्य संपादन केले होते. शाहिरी लोककला मंचच्या मुंबईतील शाहिरी लोकरंग कार्यक्रमाचे त्यांनी केलेले सूत्रसंचालन लक्षणीय ठरते आहे. त्या शिवाय अनेक वाद्यवृंद, सभा-संमेलने त्यांनी आपल्या सूत्रसंचालनाने गाजविली आहेत. त्याबद्दल त्यांना अनेक नामवत संस्थांद्वारे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल कला क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.