
कोरोनाच्या महामारीमुळे गतवर्षी वाहन उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला तरी दिवाळीनंतर मात्र वाहनांच्या विक्रीत बरीच वाढ झाली आहे. नव्या वर्षाकडून वाहन उद्योगाला खूप आशा असून येत्या काही महिन्यांत टाटा, एमजी, ह्युंदाईसारख्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मॉडेल्स लॉंच करणार आहेत.
नव्या वर्षाची धमाकेदार सुरूवात करत टाटा मोटर्सने गुरूवारी आयकॉनिक ब्रॅंड सफारीचा फर्स्ट लूक लॉंच केला. नवीन अवतारातही सफारी समृद्ध कल्पना आणि भक्कम वारसा घेऊन पुढे जाणार आहे. याच महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ही कार शोरूममध्ये दिसेल. नवीन सफारीला 2.0 लीटर, 4 सिलिंडर डिजेल इंजिन देण्यात आले आहे.
इंटेरिअर थीम ऑयस्टर व्हाईट रंगात असून कंपनी यासोबत ऍश वूड डॅशबोर्डही देत आहे. एमजी मोटरची इंटरनेट एसयूव्ही कार एमजी हेक्टर देखील नव्या ढंगात पुन्हा सादर झाली आहे. या कारमध्ये हिंगिश व्हॉईस कमांड आहे.
पाच, सहा आणि सात आसनांच्या पर्यायात ही कार उपलब्ध असून यात ड्युअल टोन एक्टेरिअर आणि इंटेरिअर, 18 इंच अलॉय क्हिल, बोल्ड थर्मोप्रेस्ड फंट कोम सारखे अनेक फिचर्स आहेत. स्कोडा ऑटो इंडियाने इंडिया 2.0 प्रकल्पांतर्गत तयार आणि डिझाईन केलेली एसयूव्ही कुशाक लवकरच लॉंच होणार आहे.एमक्यूबी एओ इन या व्यासपीठावर तयार झालेली पहिलीच कार आहे.
ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन जॅग्वॉरने बंगळुरूमध्ये शक्ती ऑटोला आपला रिटेलर कार पार्टनर म्हणून नेमले आहे. जॅग्वॉर एक्सई, एफ पेस, एफ टाईप या कार येथे उपलब्ध असतील. सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स आदी सुविधा येथे मिळतील.






























































