फुल्ल चार्जवर 315 किलोमीटर, टाटाची Tigor ev नव्या फीचर्ससह लाँच

आपली न्यू फॉरएव्हर ही ओळख कायम राखत टाटा मोटर्सने नवीन Tigor ev ही इलेकट्रीक सेडान कार लाँच केली आहे. नवीन Tigor ev आता ‘मोर टेक’ आणि ‘मोर लग्झ’ फीचर्ससह ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ही कार आता फुल्ल चार्जमध्ये 315 किलोमीटर्सचा धावणार आहे. Tigor चे 10 नवीन स्मार्ट फीचर्स ग्राहकांना आकर्षित करतील असा कंपनीचा दावा आहे. त्यामध्ये मल्टि-मोड रिजेन, झेडकनेक्ट हे कनेक्टेड कार तंत्रज्ञान, आय-टीपीएमएस आणि टायर पंक्चर दुरुस्तीचे किट हे सगळे आता सर्व श्रेणींमधील कार्ससोबत उपलब्ध आहे.

नवीन Tigor ev अनेक अव्वल दर्जाच्या व तंत्रज्ञानात्मक सुविधांसह बाजारात आली आहे. मॅग्नेटिक रेड या रंगाच्या नवीन पर्यायात उपलब्ध असलेली Tigor ev नवीन अपहोल्स्ट्री, लेदर स्टीअरिंग व्हील, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प व क्रुझ कंट्रोल या नवीन सुविधांसह अधिक आरामदायी झाली आहे. याशिवाय मल्टि-मोड रिजेन, झेडकनेक्ट हे कनेक्टेड कार तंत्रज्ञान, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, आय-टीपीएमएस व टायर पंक्चर दुरुस्तीचे किट अशा अनेक स्मार्ट फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. या सर्व सुविधा सर्व श्रेणींमधील कार्ससोबत दिल्या जाणार आहेत.

टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांच्या मते, “ईव्ही उद्योगात प्रचंड मोठी वाढ होत आहे. टाटाच्या 50,000 ईव्ही गाड्या सध्या रस्त्यांवर आहेत. या बाजारपेठेचा 89 टक्के वाटा आमच्याकडे आहे. ईव्ही बाजारपेठ जास्तीत-जास्त ग्राहकांसाठी खुली करण्याच्या उद्देशाने नुकत्याच बाजारात आणलेल्या Tiago evला तुफान प्रतिसाद मिळत आहे. लाँचनंतर केवळ महिनाभराच्या काळात या गाडीसाठी 20 हजारांहून अधिक बुकिंग झाल्या आहेत.

Tigor ev चे दर (सर्व किमती एक्स-शोरूम)
xe varient 12,49,000
xt varient 12,99,000
xz+ varient 13,49,000
xz+lx varient 13,75,000