शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार

410

नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला विरार येथील जुने विवा कॉलेज येथे हे संमेलन होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.

शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे संमेलन सुरू झाले. राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा यांनी दिली. यंदाच्या संमेलनात दिवसभर कविसंमेलन, टॉक शो, व्याख्याने असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे, असे शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या