ब्राझील संघाचे मायदेशात अंडी आणि दगडांनी स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाच वेळा जगज्जेतेपदाच्या करंडकावर नाव कोरणाऱ्या ब्राझीलच्या संघाला यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा दावेदार मानले जात होते, मात्र त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. बलाढय़ ब्राझीलवर बेल्जियमने २-१ गोलफरकाने मात केली. त्यानंतर ज्याकेळी ब्राझीलचा संघ मायदेशी परतला, तेक्हा त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियाकर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार चाहत्यांनी संघाचे खेळाडू ज्या बसमध्ये होते त्या बसवर दगड आणि अंडी फेकून आपला राग व्यक्त केला आणि खेळाडूंची बसही अडकून धरली. काही वेळाने जेव्हा बस पुढे जाऊ लागली त्यानंतरही चाहत्यांनी दगड आणि अंडी फेकणे सुरूच ठेकले. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नाइलाजाने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.