
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेचा या संघात समावेश करण्यात आला असून धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादवला डच्चू देण्यात आला आहे. जायबंदी असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा संघ निवडीदरम्यान विचार करण्यात आला नाही. या अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 7 जूनपासून लंडनमधल्या ओव्हल मैदानावर या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा अत्यंत चुरशीचा आणि रंजक सामना होण्याची शक्यता असल्याने जगभरातील क्रिकेटरसिकांचे डोळे या सामन्याकडे लागले आहेत.

























































