
पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणार्या तेजस एक्स्प्रेसला आता 12 एप्रिलपासून आठवड्यातून सहा दिवस चालविण्यात येणार आहे. जानेवारीपासून ही ट्रेन आठवड्यातून पाच दिवस धावत होती.
ट्रेन क्र. 82902 – 82901 मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी ट्रेन असून ती आयआरसीटीसीतर्फे चालविण्यात येते. आता ती आठवड्यातील सहा दिवस म्हणजे मंगळवारीही धावणार असून गुरूवारी ती साप्ताहिक मेन्टेनन्ससाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संदर्भातील स्वच्छतेचे सर्व नियम पाळून ही ट्रेन चालविण्यात येत असल्याचे आयआरसीटीसीचे प्रवक्ते पिनाकिन मोरावाला यांनी स्पष्ट केले आहे.



























































