
सामना प्रतिनिधी । परभणी
हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट आज प्रदर्शीत झाला. परभणी शहरातील अनुसया चित्रपटगृहातील पहिल्या शोचे उद्घाटन खासदार संजय जाधव तर नरेश चित्रपटगृहात आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. हा चित्रपट पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून परभणीत हा शो हाऊसफुल्ल झाला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर आधारित ‘ठाकरे’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या शोचे उदघाटन खासदार संजय जाधव यांच्याहस्ते शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. हा शो खासदार संजय जाधव यांच्या वतीने सर्वांना मोफत दाखविण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, जिल्हा परिषदेचे गटनेते राम पाटील, विधानसभाप्रमुख माणिक पोंढे पाटील, उपजिल्हा प्रमुख सदाशिव देशमुख यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.





























































