
होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटरने ठाणे येथे प्रीमियम बिग बाईक व्यवसायाशी संबंधित होंडा बिगविंगचे नवे दालन सुरू केले आहे. उद्घाटनप्रसंगी होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटरचे विक्री आणि विपणन विभागाचे यदविंदर सिंग गुलेरिया उपस्थित होते. या नव्या दालनाच्या माध्यमातून होंडाच्या आकर्षक व मध्यम आकाराच्या मोटरसायकल्स ठाण्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे गुलेरीया यांनी सांगितले. होंडा बिगविंगमध्ये नव्या राजेशाही एचनेस- सीबी 350, 2020 सिबिआर 1000 आरआर- आर फायरब्लेड, 2020 सिबिआर 1000 आरआर- आर फायरब्लेड एसपी, अॅडव्हेंचर टु 2020 आफ्रिका टि्वन अडव्हेंचर स्पोर्ट्सचा समावेश आहे.




























































