
आप सरकारची विकासकामे रोखण्यासाठी केंद्र सरकार पंजाबचा निधी थांबवत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. पंजाबच्या बठिंडा येथे आयोजित विकास क्रांती रॅलीत सहभाग घेण्यासाठी ते गेले असता त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
विरोधी पक्ष टीका करत असल्यामुळे भाजपप्रणीत केंद्र सरकार राज्यात विकासकामांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत असून विकास निधी थांबवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बठिंडासाठी तब्बल 1,125 कोटी रुपयांची तरतूद केली आणि विविध विकासकामे सुरू केल्याचेही केजरीवाल म्हणाले. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सरकार विकासकामे करत आहे. ही कामे पेंद्राला खटकत आहेत, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. आरोग्यासाठी पंजाब सरकार मोठय़ा प्रमाणावर तरतूद करत आहे, परंतु पेंद्र सरकार निधी थांबवत आहे, मान सरकारने अनेक ठिकाणी मोहल्ला क्लिनिक सुरू केले, मात्र सरकार त्यातही आडकाठी करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.
























































