हसीनों का मेला

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी उद्या, 9 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार आहे. यानिमित्ताने मुंबईत ‘हसीनों का मेला’ अवतरणार आहे. ‘फेमिना मिस इंडिया 2022’ ची विजेती सिनी शेट्टी यंदाच्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत हिंदुस्थानचे नेतृत्व करणार आहे. घाटकोपरमध्ये लहानाची मोठी झालेली 22 वर्षीय सिनी अकाऊंट्स आणि फायनान्स पदवीधर आहे.

तब्बल 28 वर्षांनंतर हिंदुस्थानात ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा पार पडत असल्यामुळे हिंदुस्थानींसाठी यंदाची स्पर्धा स्पेशल आहे. अंतिम फेरीचे सूत्रसंचालन करण जोहर आणि मेगन बाटा करणार आहेत. नेहा कक्कड, टोनी कक्कड आणि शान यांचे लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्स सोहळ्याची रंगत वाढवतील. ‘सोनी लिव्ह’वर हा सोहळा लाईव्ह पाहता येईल. आतापर्यंत रिटा फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा, मानुषी छिल्लर या हिंदुस्थानी सौंदर्यवतींनी ही स्पर्धा जिंकली आहे.