बीकेसी येथे रंगणार ‘द साऊंड ऑफ म्युझिक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या वतीने ‘द साऊंड ऑफ म्युझिक’ सादर होणार असून हे आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी आणि पसंतीला उतरलेल्या ब्रॉडवे म्युझिकल्सपैकी एक आहे. सात वेळा ‘टोनी’ पुरस्काराचा मानकरी ठरलेला या कार्यक्रमाचा प्रवेश केवळ संगीतमय नसून आंतरराष्ट्रीय ब्रॉडवेचे हिंदुस्थानात झालेले हे पदार्पण आहे. ऑस्ट्रियामध्ये 1930 दरम्यान संगीत, प्रणय आणि संघर्षावरील आनंद याद्वारे मानवी वृत्तीच्या विजयाचे चित्रण हा कार्यक्रम करतो. या दर्जेदार निर्मितीत ‘माय फेव्हरेट थिंग्ज’, ‘डू रे मी’, ‘द हिल्स आर अलाइव्ह’ आणि ‘सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हेंटीन’ यांसारख्या 26 गाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे. तिकिटे   www.nmacc.com किंवा  www.bookmyshow.com वर बुक करता येतील.