
सामना प्रतिनिधी । लातूर
जळकोट येथील बालाजी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळकोट पोलीस ठाण्यात रमाकांत सुंदरराव रामवाड (वय ६५) रा. जळकोट यांनी तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्यांनी बालाजी मंदिराच्या मेन गेटचे कुलूप, कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे चार ते पाच हजार रुपयांची चोरी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी आगलावे हे करीत आहेत.




























































