माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या बंगल्यात चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
theft cirme
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या शहरातील यशवंत कॉलनी येथील बंगल्यातून रोख अडीच लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत कॉलनीमध्ये माजी खासदार यशवंतराव गडाख हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काल रात्री चोरटय़ांनी त्यांच्या घरातील अडीच लाख रुपये चोरून नेले आहेत. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. गडाख यांनी घरात शोधाशोध केली असता, त्यांना रक्कम आढळून आली नाही. त्यामुळे विजय गडाख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सोने हे करीत आहेत.

दरम्यान, यशवंत कॉलनीच्या समोरच पोलीस मुख्यालय आहे. नगर शहरात चोऱ्या, लूटमारीचे प्रकार वाढले आहेत. यशवंत कॉलनीत गडाख यांचा बंगला आतील बाजूला आहे. तेथे सुरक्षारक्षकही नेमले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर या चोरीच्या तपासाचे आव्हान आहे.