तीस वर्षानंतर ‘आदर्श’च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत लुटला स्नेहमिलनाचा आनंद

51

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या १९८९ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा शालेय आठवणी, गुरुजनांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेला भेट व पारिवारीक स्नेहमिलन अशा विविध दिवसभराच्या कार्यक्रमांनी शुक्रवारी २८ रोजी पार पडला.

शुक्रवार २८ रोजी सकाळी १० वाजता १९८९ च्या दहावीच्या बॅचचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी चिखली येथील स्वरांजली हॉटेल येथे तब्बल ३० वर्षानंतर शेकडो विद्यार्थी एकत्र आले. त्यानंतर या स्नेहमिलन मेळाव्याचे उद्घाटन सरस्वती पूजनाने होवून गुरुजनांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यामध्ये गुरुवर्य सर्वश्री अरविंदराव असोलकर, आनंदराव हिवाळे, दत्तात्रय सराफ, शिवनारायण लंबे, व्ही.आर. देशमुख, टी.एस. पाटील, अनंत तांबोळे, भानुदास कुटे, विष्णुदत्त त्रिवेदी, एन.डी. राजपूत, संजय बिनीवाले, पी.एस. भालेराव, मदनराव देशमुख, प्रमोद देशपांडे, कोतवाल, हरपाळे, मेरत, उदावंत, एम.बी. खरात, पंढरीनाथ तुपकर यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण परिचय शिक्षकांना करुन दिला. त्यानंतर गुरुवर्य आनंदराव हिवाळे व विष्णुदत्त त्रिवेदी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आम्हाला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे प्रेम आदर मिळाला, आपण येथे ३० वर्षानंतर बोलावून आमचा जो सत्कार केला. हीच आमची गुरुदक्षिणा असून आज आमचे विद्यार्थी समाजातील सर्व क्षेत्रात चांगले नावलौकिक कमवून यशाचे शिखरे चढत स्वत: सोबतच शाळेचे व आमचे उज्ज्वल करत आहे. याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर शिक्षकांसोबत स्नेहभोजन घेवून दुपारी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे अंगी असलेले कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत जावून शाळेतील सर्व जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या निर्माणाधिन इमारतीची पाहणी केली. यावेळी संस्थेचे सचिव प्रेमराज भाला व मुख्याध्यापक मदन देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन नविन इमारतीच्या उद्घाटनाचे व माजी विद्यार्थ्यांच्या महासंमेलनाचे निमंत्रण दिले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी परिवारासह उपस्थित राहून एकमेकांना आपल्या परिवाराचा परिचय करुन देत संगीत रजनी सह स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. रात्री ११ वाजता सर्वांनी जड अंत:करणाने निरोप घेत स्नेहमिलनाचा शेवट झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गाडेकर, कृतीका सराफ, शाम मवाळ, निलेश अंजनकर, राजेश देशमाने, योगेश सावजी, पंकज कोठारी, दीपक देशमाने, सतीश शिंदे, राजश्री खंडेलवाल, वर्षा आंबेकर, निता कुळकर्णी, राहुल महाजन, रेणुकादास मुळे, आनंद बोंद्रे, आनंद जैन, विनोद नागवाणी, विवेक डहाळे, यासह अन्य मित्रांनी विशेष परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या