देशात असुरक्षित वाटणाऱ्यांना बॉम्बने उडवेन, भाजप आमदाराचे धक्कादायक विधान

33

सामना ऑनलाईन, मुझफ्फरनगर

हिंदुस्थानात आपल्याला असुरक्षित वाटतं असं म्हणणाऱ्या व्यक्ती देशद्रोही असून त्यांना बॉम्बने उडवलं पाहिजे असं वादग्रस्त भाजपच्या एका आमदाराने केलं आहे. विक्रम सैनी असं या आमदाराचं नाव असून त्यांनी म्हटलंय की मला मंत्रालयाची जबाबदारी दिली तर मीच अशा लोकांच्या पार्श्वभागात बॉम्ब लावून त्यांना उडवेन.

अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानात रहायला हल्ली भीती वाटते असं म्हटलं होतं. सैनी यांनी केलेलं विधान हे नसरुद्दीन शहा यांच्या विधानावरील प्रतिक्रिया असल्याचं बोललं जात आहे.

माझी मुलं हिंदुस्थानमध्ये राहातात त्यामुळे भीती वाटते – नसरुद्दीन शहा

आपली प्रतिक्रिया द्या