व्यावसायिकाला दहा लाखांचा चुना लावणारे तिघे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुरार येथे पाणीउपसा पंप विक्रीचा व्यवसाय करणाऱया व्यापाऱयाला तिघा भामटय़ांनी चुना लावला. व्यापाऱयाला वेगवेगळय़ा नावाने संपर्प साधून 10 लाख 45 हजाराचे 84 इलेक्ट्रिक मोटार खरेदी केल्यानंतर आरोपींनी त्यांना बंद खात्याचा धनादेश देऊन फसवले. आपण गुजरातमध्ये राहतो म्हणजे आपल्याला कोणी पकडणार नाही अशा हवेत ते भामटे होते, मात्र कुरार पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन तिघांच्या मुसक्या आवळल्या आणि गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

रणजीत वाकळे यांचा कुरार परिसरात मयूर इंडस्ट्रीज नावाने पाणीउपसा पंप विक्रीचा व्यवसाय आहे. 27 एप्रिल ते 28 नोव्हेंबरदरम्यान चिराग, परेश, धवल, मेहुल आदी नावांनी तसेच वेगवेगळय़ा बनावट ई-मेलद्वारे आरोपींनी वाकळे यांना संपर्क साधला व त्यांच्याकडून 84 इलेक्ट्रिक मोटार खरेदी केल्या. पण रोख पैसे न देता त्यांना बंद खात्याचा 10 लाख 45 हजारांचा धनादेश देऊन फसवणूक केली. त्यामुळे वाकळे यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात आधी मीरा रोड येथे राहणाऱया धर्मिल चोक्षी (22) याचे नाव समोर आले. त्याला पकडल्यानंतर छत्रसिंह परमार ऊर्फ सतीश याचे नाव समजताच त्याला अहमदाबाद येथे ताब्यात घेण्यात आले.