मुदत उलटूनही तीन लाख जणांनी दुसरा डोस घेतला नाही;शोध घेण्यासाठी प्रत्येक वॉर्डात पालिकेची शोधमोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका लसीकरण पूर्ण करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत असताना तब्बल तीन लाख जणांनी मुदत संपून गेली तरी दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने सर्व 24 वॉर्डांत शोधमोहीम सुरू केली आहे. यासाठी संबंधित लाभार्थ्यांची यादी वॉर्ड ऑफिसमध्ये पाठवण्यात आली आहे. शिवाय पालिका आपल्या कर्मचाऱयांच्या माध्यमातून अशा नागरिकांचा शोध घेत आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. या वेळी सुरुवातीला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 28 दिवसांची मुदत होती, मात्र काही दिवसांनी पेंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही मुदत 84 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली, मात्र मुदत वाढवूनही अनेकांनी दुसरा डोस घेण्यास हलगर्जीपणा दाखवला असल्याचे समोर आले आहे. पहिला डोस मुंबईत घेतल्यानंतर अनेक जण बाहेरगावी गेले आहेत तर काही जण वैयक्तिक कारणांनी लसीकरणापासून दूर आहेत, मात्र याचा फटका पालिकेच्या लसीकरण मोहिमेला बसला आहे. त्यामुळे दुसरा डोस मुदत संपूनही घेतला नसलेल्यांनी तातडीने नजीकच्या लसीकरण पेंद्रावर जाऊन डोस घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिका अशा करतेय उपाययोजना

  • प्रत्येक सोसायटी, झोपडपट्टी भागात जाऊन पालिका कर्मचारी रहिवाशांशी संवाद साधत आहेत.
  • दुसरा किंवा पहिला डोस घेतला नसल्यास सोसायटय़ा किंवा झोपडपट्टी भागात विशेष लसीकरण उपक्रम.
  • लसीकरणासाठी आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्टसह 14 प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य.
  • रस्त्यावर राहणारे, निराधारांना डोस देण्यासाठी रेल्वे स्टेशन, विविध भागांत विशेष मोहीम.
  • ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ उपक्रमांतर्गत हेल्थ पोस्टचे स्टाफ, वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून संपर्प
  • पालिकेच्या माध्यमातून वारंवार फोन करून लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन.