गोपनीय माहिती लीकप्रकरणी नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नौदलाच्या किलो क्लास पाणबुडीतील सुधारणा आणि अद्ययावतीकरणाबाबतची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयने एक विद्यमान नौदल अधिकारी आणि दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी एकाला अटक होण्याची शक्यता असून परदेशी हेरसंस्थांचाही त्यात सहभाग होता का यासंदर्भातही चौकशी केली जाणार आहे.

पाणबुडीची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप असलेला अधिकारी हा मुंबईमध्ये नौदल कमांडर आहे. त्याला कर्तव्यावर असताना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास नौदलाचे व्हाईस ऍडमिरल आणि रिअर ऍडमिरल यांच्याकडून केला जात असल्याची माहिती नौदलाच्या सूत्रांनी दिली.