तरुणाईला झाले तरी काय? एका दिवसात तिघांचा गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

आजारपण आणि नैराश्याला कंटाळून उल्हासनगरमध्ये विविध घटनेत तीन जणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन तरुणींचा तर एका तरुणाचा समावेश आहे. एकाच दिवशी आत्महत्येच्या या तीन घटना घडल्यामुळे उल्हासनगर हादरले असून तरुणाईला झाले तरी काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरातील कॅम्प क्र. 4 येथील ब्राह्मणपाडा परिसरात राहणारे अजय बर्वे (38) याने आजाराला कंटाळून बुधवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मानेरेगाव परिसरात राहणारी सपना शर्मा (19) हिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्याच पद्धतीने नेहा भोईर (20) या तरुणीनेदेखील गळफास घेतला. या दोन्ही तरुणींनी गळफास का घेतला याचे नेमके कारण अद्यापि समजू शकले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.