थ्रीलर सिनेमात झळकणार आर. माधवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘दृश्यम 2’ आणि ‘भोला’नंतर अजय देवगणने आता त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. विकास बहल दिग्दर्शित सुपर नॅचरल थ्रीलरमध्ये अजय देवगणसोबत अभिनेता आर. माधवनदेखील स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. पहिल्यांदाच हे दोन्ही अभिनेते एकत्र काम करणार आहेत.

याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या टायटलची घोषणा झाली नाही. जून महिन्यापासून शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. मुंबई, म्हैसूर आणि लंडन येथे चित्रपटाचे शूटिंग पार पडणार आहे. कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांच्यासोबत या चित्रपटाची सहनिर्मिती अजय देवगण करणार आहे.