
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वनविकास महामंडळ वन परिक्षेत्र वनविकास महामंडळातील बिटातील जंगलात वाघाने गुराख्यावर हल्ला करून जबर जखमी केले आहे. प्रभुदास कान्हूजी मसराम (55) असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
बुधवारी जंगलामध्ये गुर चरण्यासाठी घेऊन गेल्या प्रभुदास यांना पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्या पाठीवर, छातीवर व डाव्या हातावर गंभीर जखम झाली आहे. ही माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. यानंतर वनविकास महामंडळ पाथरीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि पंचनामा करून जखमी व्यक्तीला घेऊन प्राथमिक स्वास्थ केंद्र गुंजेवाही येथील दवाखान्यात नेले. प्राथमिक इलाज करून त्याला गंभीर जखम असल्याने जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.



























































