चार्जर वाघापाठोपाठ वाघिणीचा मृत्यू, विषप्रयोगाचा दाट संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dead-tiger
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नागपूर

उमरेड-करांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी रेंज कोअर एरियामध्ये चार्जर नावाचा वाघ रविवारी मृतावस्थेत आढळला होता. त्याच भागात आज एका वाघिणीचा मृतदेह आढळला. त्यामुळे खळबळ उडाली असून वनविभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

चार्जर वाघाचा मृतदेह रविवारी आढळल्यानंतर या भागात वनविभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. चार्जरच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू असतानाच वाघिणीचा मृतदेह आढळला. चार्जचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचा संशय होता. त्याचप्रमाणे शिकार करण्याच्या उद्देशानेच वाघिणीवर देखील विष प्रयोग तर करण्यात आला नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, चार्जर हा वाघ 7 ते 8 वर्षांचा असून तो स्थलांतरित असल्याचे समजते. उमरेड-करांडला या व्याघ्र प्रकल्पात रविवारी सकाळी काही पर्यटक गाईडसोबत फिरत असताना कोअर एरियामध्ये त्यांना वाघ पडून असल्याचे दिसले होते.