
सामना ऑनलाईन, चिपळूण
चिपळूणच्या तिवरे धरणफुटीनंतर बेपत्ता झालेल्या 23 गावकऱ्यापैकी पाचजण अद्यापही बेपत्ता आहेत. 18 जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. परंतु उर्वरित पाच जणांचा ठावठिकाणा लागत नसल्याने तिवरेवासीय शोकाकूल अवस्थेत आहेत.
एनडीआरएफचे पथक, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि तिवरे ग्रामस्थ या बेपत्ता गावकऱ्यांचा शोध घेत आहेत. 18 मृतदेहांपैकी 17 जणांची ओळख पटली आहे. तिवरेच्या भेंडेवाडीतील बळीराम कृष्णा चव्हाण हे अठरा तासांनंतर जिवंत सापडल्याने गावकऱ्यांमध्ये इतर बेपत्ता गावकऱ्यांबद्दलही आशेचा किरण निर्माण झाला आहे.
48 घरे अंधारात
धरणफुटीमध्ये भेंडेवाडीतील 15 घरांचे नुकसान झाले. 48 घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. विजेचे 22 खांब वाहून गेले. ते खांब पुन्हा उभारण्यात येत असून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.


























































