
भाजपचे नेते संबित पात्रा टूलकिट प्रकरणी ट्विटर इंडियाच्या कार्यालयामध्ये दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी छापा टाकला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर टूलकिट प्रकरणी आरोप केले होते. यावरून वादळ उठलेले असतानाच मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसप्रणित टूलकिट टॅग बनविल्याचा आरोप ट्विटरवर पात्रा यांच्याकडून करण्यात आला होता. याविरोधात दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला स्पष्टीकरण देण्यासाठी सकाळी नोटीस पाठविली आणि संध्याकाळी छापा टाकला.
ही नेहमीची प्रक्रिया आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्याआधी दिल्ली पोलीस ट्विटर इंडियाच्या कार्यालयात गेल्याने पोलिसांनी छापा टाकल्याचे समजले होते. तसेच तपासणी केल्याचेही बोलले जात आहे. अद्याप ट्विटरकडून यावर कोणताही खुलासा आलेला नाही. जबाबदार अधिकाऱ्यांच्या हाती नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलीस ट्विटरच्या कार्यालयात गेल्याचे सांगण्यात येत आहे.





























































