सहलीच्या नावाखाली प्रवाशांना 11 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहल आयोजित न करता टुर व्यावसायिकाने सात पर्यंटकांची 11 लाख 27 हजारांची फसवणूक केली. संबंधित व्यावसायिक कार्यालय बंद करुन फरार झाला आहे.

विकी बाळकृष्ण ठक्कर (रा. के.के.मार्केट, बालाजीनगर, धनकवडी) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रनछोड नागिनदास नागर (वय 71, रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी नागर आणि इतर सहा जणांनी कुलू-मनाली, उटी पर्यटनस्थळांसाठी आरोपी ठक्करकडे बुकींग केले होते. डिसेंबर 2019 मध्ये बुकिंग केल्यावर लॉकडाऊन सुरू झाले.

त्यानंतर मार्च 2020 मध्ये फिर्यादी व इतर पर्यटकांनी ठक्करकडे पैशांची परत मागणी केली. मात्र त्याने पैसे हॉटेल बुकिंग व इतर ठिकाणी दिले असल्याचे सांगितले. त्याशिवाय पैसे परत येण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर ठक्कर कार्यालय बंद करून निघून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे करत आहे.