Toyota Kirloskar Motor च्या विक्रीत 20.45 टक्क्यांनी घट

Toyota Kirloskar Motor ने गुरुवारी सप्टेंबर 2020 मधील वाहन विक्रीचा अहवाल जाहीर केला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीने 8,116 मोटारींची विक्री केली असून Toyota च्या वाहन विक्रीत 20.45 टक्क्यांनी घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये 10,203 कारची विक्री झाली होती.

टीकेएमचे सेल्स अँड सर्व्हिसचे उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी सांगितले की, ‘आम्हाला मागील काही महिन्यांपासून मागणीत वाढ झालेली दिसली आहे. तसेच आमचा डीलर्सवर पूर्वीपेक्षा अधिक विश्वास निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कार विक्रीत 14 ते 18 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोना संकटा दरम्यान कंपनीसाठी सप्टेंबर हा सर्वात फायदेशीर ठरला आहे.’

दरम्यान, Toyota ने नुकतीच हिंदुस्थानात आपली नवीन Toyota Urban Cruiser लॉन्च केली आहे. Urban Cruiser मध्ये कंपनीने 1.5 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 6000 Rpm वर 81.86 Hp पॉवर आणि 4000 Rpm वर 114.73 Nm टॉर्क जनरेट करते. याची एक्स-शोरूम किंमत 8,40,000 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या