
नागद – कन्नड गौताळा घाटात म्हसोबा हुडीजवळ पहिल्याच वळणावर दरड कोसळली. याठिकाणी पहिल्या हुडीपासून तर दुसऱ्या वळणापर्यंत रस्ता धोकादायक झाला आहे. अनेक ठिकाणी मोठे दगड वर अडकलेले असून, दरडी कोसळण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या कक्ष क्रमांक 548-549 जवळ दरड कोसळली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी सांगितले.
मागील आठवड्यात औट्रम घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून त्यात अनेक टी-मोठी वाहने अडकून पडली. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. तेव्हापासून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
पर्यायी रस्ता म्हणून गौताळा घाटातून रस्त्यावरून वाहने जात होती. गौताळा घाटात दरड कोसळल्याने कन्नडकडे जाणाऱ्या न सिल्लोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन सायंकाळी हा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले.



























































