कुंभमेळ्यात आता तृतीयपंथीयांचा आखाडा

45

सामना ऑनलाईन । प्रयागराज

प्रयगराज येथे येत्या 15 जानेवारीपासून अर्ध कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. या आखाड्यासाठी देशभरातील साधूसंतांचे 14 आखाडे कुंभनगरीत दाखल होणार असून यंदा कुंभमेळ्यात तृतीयपंथीयांचा आखाडा देखील सहभागी होणार आहे. किन्नर आखाडा असे त्या आखाड्याचे नाव असून लक्ष्मी नारायण त्रिपाठी या आखाड्याच्या प्रमुख असणार आहेत.

‘कुंभ मेळ्यात आमच्या आखाड्याला सहभागी होण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. यावरून समाज आता आम्हाला स्वीकार करत चालला आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून या कुंभ मेळ्यासाठी तयारी करत आहोत. त्यामुळे आम्ही यात सहभागी व्हायला फार उत्सुक आहोत. सुरुवातीला आम्हाला विरोध झाला पण आता तो देखील मावळला आहे’, असे लक्ष्मी त्रिपाठी यांनी सांगितले.

येत्या 15 जानेवारी पासून प्रयागराज येथील गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर अर्ध कुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. हा कुंभ मेळा 3 मार्च पर्यंत सुरू राहणार असून त्यासाठी देशभरातून भाविक येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या