धोके फॅड डाएटचे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यंत कमी वेळात किंवा झटपट वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती आपण सोशल मीडिया, मासिक यात रोजच्या रोज बघत असतो. लग्न किंवा साखरपुडा, गेट-टुगेदर, ट्रिप यांसारख्या कार्यक्रमासाठी तुम्ही पटकन काही किलो वजन कमी करण्यास उत्सुक असाल तर तुम्ही कदाचित या जाहिरातीकडे जास्तच आकर्षित होऊ शकता. तथापि, यापैकी बऱयाच ट्रेंडी फॅड डाएट नेहमी योग्य असतातच असे नाही आणि त्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते.

मुख्य मुद्दा असा आहे की, यापैकी बहुतेक आहार वजन कमी करण्याच्या चुकीच्या मार्गावर लक्ष केंद्रित करतात आणि प्रत्यक्षात लठ्ठपणाचे खरे शरीर विज्ञान शोधत नाहीत तसेच झटपट वजन कमी करण्याच्या नादात ते अशास्त्राrय असू शकतात.

– झटपट वजन कमी आणि फॅड डाएट धोकादायक असतात. काही फॅड डाएट काही पदार्थांना जास्त महत्त्व देतात, ते तात्पुरते उपाय सुचवतात. फॅड आहार वास्तविक, शाश्वत जीवनशैलीतील बदलांवर लक्ष केंद्रित करत नाही, ज्यामुळे तुमचे वजन कमी राहते. म्हणून एकदा ‘आहार’ संपला की, वजन तितक्याच वेगाने परत येते.

– वजन खूप लवकर आणि योग्य पोषणाशिवाय कमी केल्यानेदेखील तुमचे स्नायू गमावू शकतात, ज्यामुळे अशक्तपणा येतो, केस गळतात.

– खूप कमी कॅलरीज, रात्री न जेवणे, दोन वेळा खाणे, रात्रीचे जेवण टाळणे शरीराला आवश्यक असलेले पोषण कमी करण्याचा धोका उत्पन्न करतात.

– बऱयाच फॅड डाएटसाठी तुम्हाला महागडी पुस्तके, सप्लिमेंट्स, शेक खरेदी करण्याची किंवा महागडय़ा कार्यक्रमात नावनोंदणी करावी लागते. त्यापेक्षा तुमचे पैसे पौष्टिक फळे, भाज्या, सुका मेवा, प्रथिने आणि संपूर्ण धान्य यामध्ये गुंतवून चांगले खर्च केले जाऊ शकतात. वास्तविक, शाश्वत वजन कमी कसे करावे आणि जीवनशैली समृद्ध करण्याकडे लक्ष द्या. वाढवलेले वजन कमी होण्यास बराच वेळ लागू शकतो, परंतु त्यावर लक्ष पेंद्रित करा, आरोग्यदायी सवयी लावा, ज्यामुळे निरोगी भविष्य सुनिश्चित होईल.

नक्की विचार करा
– दुर्दैवाने, कोणतीही गोळी, पावडर किंवा अन्न जादुई उपचार नाही. पुढच्या वेळी तुम्ही वजन कमी करणारी जाहिरात पहाल तेव्हा दोनदा विचार करा.

– जलद आणि सहज वजन कमी करण्याचा दावा करताना एकच पदार्थ खा म्हणजे ग्रेप प्रूट डाएट, कोबी डाएट वगैरे सांगितले जाते. हा आहार संतुलित नाही.

– काही फॅड आहार विशिष्ट अन्न गट काढून टाकते (उदाहरणार्थ, कर्बोदक). फॅट बर्नर, चयापचय बूस्टर किंवा वजन कमी करणारे साधन म्हणून लेबल केलेले विशेष ‘शेक’ घेऊन आपले खूप सारे पैसे जातात, त्यांचे दुष्परिणामही होतात.

– व्यायामाची गरज नाही अशा जाहिराती खूप बघतो, पण मुळात व्यायाम सर्वांसाठी इतका गरजेचा आहे की, व्यायाम न करता वजन कमी करा हे सांगणेच खूप चुकीचे आहे.

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ