सत्य आणि न्यायाचाच विजय, निर्णयाचे स्वागत – मोदी

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सत्य आणि न्यायाचाच विजय असून तथ्यांवरील विस्तृत अभ्यासावर आधारित या निर्णयासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अभिनंदन. मला खात्री आहे की, जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर दिली आहे. तसेच आमचे सरकार सदैव प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत राहील, असेही मोदींनी नमूद केले.

याआधी बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अटकेप्रकरणी अंतिम सुनावणी झाली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या 16 न्यायाधीशांपैकी 15 न्यायाधीशांनी हिंदुस्थानच्या बाजूने निकाल देत जाधव यांच्या फाशीच्या स्थगितीचा निर्णय कायम ठेवला. तसेच पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवला.

आपली प्रतिक्रिया द्या