तुळजा भवानी देवस्थान जमीन गैरव्यवहार; चौकशीसाठी समितीची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदिर, देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहार चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अहिल्यानगर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. एका महिन्यात ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल. महसूल व वन विभागाने याबाबतचा जीआर (शासन निर्णय) जारी केला आहे.

विधानसभेत तुळजा भवानी देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा याबाबतची चौकशी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.