
सामना प्रतिनिधी । मुंबई
नवीन वर्ष स्वागतासाठी सध्या मुंबईत टर्की आणि बदके विक्रीसाठी आणली जात आहेत. ग्रॅँट रोड येथील शॉप नंबर 18 येथून विक्रीसाठी आणलेल्या 2 टर्की जातीच्या पक्ष्यांची आणि 5 बदकांची प्राणीमित्रांनी शुक्रवारी सुटका केली. त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले आणि या पक्ष्यांची सुटका करून त्यांना बैलघोडा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या हवाली केले.


























































