
सुपरस्टार जोसेफ विजय (थलपति) यांच्या टीवीके सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री रमेश यांनी आज मंदिर संस्थानांना दणका दिला आहे. ते तोंडाला मास्क लावून साध्या वेशात प्रसिद्ध तिरुचेंदुर सुब्रमण्यम स्वामी मंदिरात पोहोचले. तेथे दर्शनासाठी रांगेत उभे असताना एका पुजाऱ्याने त्यांच्याकडे व्हीआयपी दर्शनासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. यावर संतापलेले रमेश यांनी भाविकांची लूट करणाऱया पुजाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच त्याला मंदिरात प्रवेश करणे व पूजा-पाठ करण्यास पूर्णपणे बंदी लागू केली आहे.























































