लाचप्रकरणात पुरवठा निरीक्षकासह दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाच घेणाऱया पुरवठा निरीक्षकासह संगणकचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम वामन गायकवाड व संगणकचालक बालाजी सिद्धेश्वर यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मंगळवेढय़ातील एका स्वस्त धान्यदुकानदाराने प्रत्येक महिन्याला मिळणाऱया धान्यासाठी चलन रक्कम पास करून घेण्यासाठी बालाजी यादव याला भेटले. यादवने चलन पास करण्यासाठी स्वतःकरिता अडीचशे रुपये व साहेबांकरिता म्हणून 1200 रुपयांची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपतकडे तक्रार दाखल झाली होती. मंगळवेढा येथे सापळा रचण्यात आला. गायकवाड व यादव या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.