शिवाजीनगरमध्ये दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटील इस्टेटमधील भाई असल्याचे सांगत टोळक्याने दोघा भावडांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल रात्री नउ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट परिसरात घडली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.

आदिल जावेद शेख (वय 19), अमन दस्तगीर शेख (वय 21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याविरूद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रूपचंद सोळंकी आणि प्रकाश सोळंकी अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

काल रात्री पावणेनउच्या सुमारास प्रकाश आणि प्रमोद भावंडे पाटील इस्टेट परिसरात थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना तुम दोनो भाई पाटील इस्टेट का नेता हो गये क्या, तुम्हारी नेतागिरी निकालता हू असे म्हणत आदिलने प्रमोद यांच्या डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर फायटरने मारहाण केली. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून प्रकाश आणि प्रमोदला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ तपास करीत आहेत.