जुन्या भांडणातून तरूणावर वार, टोळके जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला करणार्‍या टोळक्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. ही घटना 27 नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास धनकवडीत घडली.

सागर जयसिंग ढमढेरे (20), ओंकार संतोष येनपुरे (23), सुमीत संतोष येणपुरे (20) सर्व रा. धनकवडी आणि रूपेश किसन खोपडे (32) रा. पद्मावती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश पवळे (31) यांनी सहकानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी योगेश आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीतील आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याच रागातून टोळक्याने २७ नोव्हेंबरला आरोपींनी योगेशवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे तपास करीत आहेत.