पाण्याचे ड्रम भरलेली बैलगाडी उलटून दोन चिमुरड्यांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । माजलगाव

पाण्याचे ड्रम भरून ठेवलेली बैलगाडी उलटून दोन लहान मुले चिरडून ठार झाल्याची हृदयद्रावक घटना वडवणी तालुक्यातील चिंचाळा तांडा येथे सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली. जयदेव बळीराम राठोड (8), अविष्कार बळीराम राठोड (4) अशी दोन्ही मुलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचाळा तांडा येथे दुपारी उभ्या असलेल्या बैलगाडीत 2 ड्रम पाण्याने भरलेले होते व गाडी उभी होती. उन जास्त असल्याने मुले बैलगाडीखाली सावली असल्याने खेळू लागले. मुले खेळत असताना गाडीला लटकले त्यामुळे गाडी उलटली व दोघे त्याखाली येऊन ठार झाले. या घटनेने तांड्यावर मुलांच्या कुटुंबात आक्रोश सुरू होता.