सेल्फी घेताना पाय घसरून वैतरणा नदीत चार जण पडले, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नका, असं आवाहन वारंवार करण्यात येतं. पण, तरीही अशा सूचनांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात. विरारजवळ अशाच एका घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

विरारजवळील वैतरणा नदीत एकाच कुटुंबातील चार जण बुडाल्याचं वृत्त आहे. सेल्फी घेताना नदीच्या काठावरून घसरून पडल्याने हे चौघं जण नदीत पडले. त्यापैकी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. नीला दामिसिंह डासना (24) आणि संतू डासना (15) अशी मृत महिलांची नावं आहेत. दोन्ही महिलांचे मृतदेह सापडले आहेत.