अंधेरीच्या गोखले पुलाचे दोन महाकाय गर्डर हटवले, पश्चिम रेल्वेकडून अर्धी मोहीम फत्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाचे दोन महाकाय गर्डर पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्री हटवले आहेत. रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे गर्डर हटवण्यासाठी मध्यरात्री पाच तासांचा पॉवर ब्लॉक घेतला होता. रेल्वे ट्रकच्या बाहेर व्रेन उभी करून सदरचे गर्डर हटवणे मोठे आव्हानाचे काम होते. मात्र रेल्वेने दोन गर्डर सुरक्षित हटवण्याची मोहीम फत्ते केली आहे. गोखले पूल मोडकळीस आल्याने पालिकेने हा पूल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पूल हटवला आहे. मात्र रेल्वेच्या हद्दीतील गर्डर अद्याप हटवले नव्हते. त्यामुळे नवीन पुलाच्या उभारणीला विलंब होत आहे. त्याची दखल घेत रेल्वेने मध्यरात्री हे गर्डर हटवले तर उर्वरित दोन गर्डर फेब्रुवारीअखेरीस हटवण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.