
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया दोन नराधमांना संतप्त गावकऱयांनी बेदम चोप देत जिवंत पेटवले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा नराधम मृत्यूशी झुंज देत आहे. झारखंडच्या गुमला जिह्यात ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी ही आईवडिलांसोबत लग्नाला गेली होती. बुधवारी रात्री तेथून घरी परतताना बस चुकली.
दरम्यान शेजारच्या गावातील दोन तरुण दुचाकीवरून चालले होते. पीडितेच्या वडिलांनी त्यांना मुलीला घरी सोडण्यास सांगितले. त्या तरुणांनी वाटेत मुलीवर अत्याचार केला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर संतप्त गावकऱयांनी दोघांना बेदम मारहाण करत जिवंत पेटवले. यात आरोपी सुनील उराव याचा मृत्यू झाला, तर दुसऱयाची प्रकृती चिंताजनक आहे.




























































