दोन मुलांची वृद्ध पित्याला लाथा बुक्क्याने मारहाण, व्हिडीओ व्हायरल

प्रातिनिधिक फोटो

वृद्धपकाळात आई वडिलांना आधार द्यायाच्या काळात अनेक मुलं त्यांना वाऱ्यावर सोडतात, संपत्तीच्या वादातून त्यांना मारहाण करणे, हत्या करणे अशी अनेक उदाहरणं समाजात आहेत. दिल्लीतील नोयडा येथे राहणाऱ्या एका वृद्धासोबत देखील असाच प्रकार घडला आहे. या वृद्धाला त्याच्या दोन मुलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी त्या दोन्ही निष्ठूर मुलांना अटक केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत ही दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांना खेचत घराबाहेर येत असून त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करताना दिसत आहेत. दिल्लीतील दानकुर शहरातील गौतम बुद्धा नगरमध्ये घडली आहे. वडिल संपत्तीची वाटणी करत नसल्याने या दोन भावाचा वडिलांचा वाद सुरू होता असे समजते.

दारूला पैसे दिले नाही म्हणून आई वडिलांना मारहाण 

काही महिन्यांपूर्वी पंढरपूर येथे एका  व्यसनी तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही म्हणून तरुण मुलाने आई-वडिलांना मारहाण केली. तरुणाने आईस कत्तीने मारहाण केली, तर वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात धोंडीराम नागनाथ काळे यांनी तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या