
सामना ऑनलाईन । नोएडा
नोएडामधील एका शाळेतील पंख्याला गळफास लावून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गळफास घेणाऱ्यांमध्ये 12 वीचा विद्यार्थी आणि 11 वीची विद्यार्थीनी आहे. त्या दोघांचे मृतदेह शाळेत एका वर्गातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. प्रेम प्रकरणातून या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी ग्रेटर नोएडा पोलीस अधिक तपास करत आहेत.






















































